उड्डाण पुलावरील दुभाजकावर चढली गाडी

पनवेल, दि. 22 (वार्ताहर) : भरधाव वेगाने पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारी टी परमिट गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने सदर गाडी विरुद्ध बाजूला जावून दुभाजकावरच चढल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी दिडच्या सुमारास घडला आहे.

पुणे बाजूकडून टी परमिट स्वीफ्ट गाडी नं.एमएच-01-सीजे-6156 ही गाडी घेवून सदर गाडीचा चालक भरधाव वेगाने मुंबईबाजूकडे चालला असताना शिवशंभो नाक्यावरील उड्डाण पुलावरुन सदर गाडी घेवून येत असताना महानगर गॅस समोरील भागात सदर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून त्याची गाडी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर चढून बंद झाली. भितीने चालक गाडीबाहेर आला होता. दरम्यान दोन्ही बाजूकडून तुरळक वाहतूक होत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या घटनेची माहिती पनवेल वाहतूक पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी रवाना झाले आहेत. अधिक माहितीमध्य सदर चालकाने मद्यपान प्राशन केल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *