लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्रतर्फे मुख्यमंत्री सहाय्यक निधीसाठी 2 लाखाचा धनादेश
पनवेल, दि. 22 (वार्ताहर) : सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी राज्यासाठी कौतुकाचे काम करीत असून गोरगरीब, गरजू वंचितांना मदतीचा हात म्हणून लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्रतर्फे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय अनुसया राजाराम सोनावणे यांनी 2 लाखाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला आहे.
लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्रचे विविध पदाधिकारी, सदस्य तसेच पत्रकार म्हणून काम करीत असलेले धम्मशील सावंत आणि संजय कदम हे दोघे कोरोना योद्धा म्हणून लॉकडाऊन घोषित झाल्यापासून सातत्याने गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य, औषधे आदींचे वाटप दिवसरात्र अविरतपणे करीत आहेत. या त्यांच्या निवार्स्थी लोकसेवेबद्दल पर्यायाने राज्याच्या आणि देशाच्या सेवेबद्दल त्यांचे संस्थेतर्फे कौतुक करण्यात येत आहे असे अध्यक्ष संजय सोनावणे यांनी प्रसिद्धी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्याचप्रमाणे उपसरपंच राजेश कांबळे, संघटनेचे सदस्य मारुती बागवे, पत्रकार गौतम जाधव, विनोद सापळे आदी सुद्धा आपापल्या विभाागात एक कोव्हीड योद्धा म्हणून काम करीत आहे. अशांचे कौतुक लवकरच संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. दरम्यान पोलीस, डॉक्टर, नर्सेस अत्यावश्यक सेवा देणारे सर्व शासकीय कर्मचारी वर्ग, भारतीय लष्कर, निम पोलीस बल, घरातील माताभगिनी, अन्नदात्री यांचे आभार मानावे तेवढे थोडेच असल्याचे संजय सोनावणे यांनी सांगितले आहे.