गटारांच्या सफाईतून निघालेला कचरा व मातीचे ढिगारे तात्काळ हटवा : नवी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव विरेद्र म्हात्रे

नवी मुंबई : नेरुळ गाव व नेरूळ सेक्टर विस परिसरातील गटारांच्या सफाईतून निघालेला कचरा व मातीचे ढिगारे तात्काळ हटविण्याची मागणी नवी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव विरेद्र म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.

नेरुळ गाव व नेरूळ सेक्टर विस परिसरात पावसाळी पूर्व कामांअंर्तगत महापालिका प्रशासनाने गटारांची सफाई करताना त्यातील माती व गटारात तुंबलेला कचरा काढण्यात आला. त्याबाबत सर्वप्रथम आपले नेरुळगावच्या ग्रामस्थांकडून व नेरूळ सेक्टर विसमधील रहीवाशांकडून मनापासून नवी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव विरेद्र म्हात्रे यांनी आभार मानले. नेरुळ गाव व नेरूळ सेक्टर विस परिसरातील गटारांची सफाई करावी यासाठी नवी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव विरेद्र म्हात्रे यांनी एक महिन्यापूर्वीच महापालिका प्रशासनाला  निवेदनही सादर केले होते. 

महापालिका प्रशासनाने गटारांची सफाई करताना जो गाळ, कचरा बाहेर काढला, त्यालाही आता सहा-सात झाले आहेत. गटारातून बाहेर काढलेला गाळ, कचरा आता सुकला  असून त्याची  दुर्गंधी आता ग्रामस्थांना व रहीवाशांना सहन करावा लागत आहे. सध्या कोरोनाचा  काळ  आहे. आमच्या परिसरात ३ कोरोनाचे रूग्ण सापडले आहे. परिसरातील रहीवाशांत भीतीचे वातावरण आहे. त्यातच या दुर्गंधी पसरल्याने लोकांमध्ये आजार वाढण्याची भीती आहे. ही समस्या दोन दिवसापूर्वीच पालिका नेरूळ विभाग कार्यालयाच्या निदर्शनास आणून देवूनही कचरा  व मातीचे ढिगारे अजूनही हटविण्यात आलेले नाहीत. यामुळे परिसरालाही बकालपणा आलेला असल्याचे नवी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव विरेद्र म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

लोक नाराज आहेत. कोरोनाच्या भीतीखाली वावरत आहेत. त्यातच आता कचऱ्याच्या सुकलेल्या ढिगाऱ्यामुळे दुर्गंधीचाही सामना करावा लागत आहे. समस्येचे गांभीर्य पाहून आपण पालिकेच्या संबंधित विभागाला सेक्टर २० परिसरातील व नेरुळ गावातील गटारांच्या बाजूलाच  ठेवलेले मातीचे ढिगारे व कचरा हटविण्याचे आदेश देण्याची मागणी विरेंद्र म्हात्रे यांनी केली आहे.

विरेंद्र म्हात्रे यांनी ईमेलच्या माध्यमातून महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे ही तक्रार करताच त्यांनी अवघ्या २५ मिनिटात विरेंद्र म्हात्रे यांच्या तक्रारीची दखल घेत उपायुक्त टी.पी.पवार यांना या समस्येचे निवारण करण्याचे निर्देश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *