तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये कारखान्याला लागली आग

पनवेल दि. २१ (वार्ताहर)- पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका कारखान्याला गुरुवारी दुपारी अचानकपणे आग लागल्याने या आगीत कारखान्याचे मोठे नुकसान झाले असले तरी, कोणत्याहीप्रकारची जीवीतहानी झाली नाही.

तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या दीप केम या कारखान्याला आज दुपारी अचानकपणे आग लागली, आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीत कोणत्याहीप्रकारची जीवीतहानी झाली नाही आहे. तसेच आगीचे कारण अद्याप कळले नाही. या घटनेची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *