बॅंक ऑफ बडोदा यांनी केले “आर्सेनिक अल्बम-३०” या होमीयोपॅथीक गोळ्यांचे पोलिसांनी मोफत वाटप
पनवेल दि. 20 (वार्ताहर): बॅंक ऑफ बडोदा कामोठे शाखेच्या वतीने व एन. कनेक्ट डॉ. नितीन पोवळे यांच्या सहकार्याने कामोठे पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना “आर्सेनिक अल्बम-३०” या होमीयोपॅथीक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
आयुष मंत्रालय यांच्या शिफारशीनुसार “आर्सेनिक अल्बम-३०” या होमीयोपॅथीक गोळ्यांचा डोस रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत असल्यामुळे “आर्सेनिक अल्बम-३०” या गोळ्यांचे मोफत वाटप करण्याचा उपक्रम बॅंक ऑफ बडोदा कामोठे व एन. कनेक्ट डॉ. नितीन पोवळे यांच्या सहकार्याने राबविला जात असून त्यांनी आज कामोठे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबसाहेब तुपे यांच्याकडे सदर गोळ्यांचे किट सुपूर्त केले. यावेळी बॅंक ऑफ बडोदा कामोठे शाखेचे व्यवस्थापक संजय गोडसे व डॉ. नितीन पोवळे आदी उपस्थित होते.
फोटोः बॅंक ऑफ बडोदा कामोठे शाखेच्या वतीने व एन. कनेक्ट डॉ. नितीन पोवळे यांच्या सहकार्याने कामोठे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबसाहेब तुपे यांच्याकडे सदर गोळ्यांचे किट सुपूर्त करताना बॅंक ऑफ बडोदा कामोठे शाखेचे व्यवस्थापक संजय गोडसे व डॉ. नितीन पोवळे आदी