सामाजिक कार्यकर्ते इरफान तांबोळी,तबरेझ कच्छी आणि त्यांचा सर्व ग्रुप गरीब मजदूर मुस्लिम बांधवांच्या हाकेला आले धावून…
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता लॉकडाउन पूर्ण भारतभर घोषित केला गेला.अश्या वेळी मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना या महिन्यात दिवसभर न खाता- पिता अतिशय कडक पद्धतीने उपवास ठेवले जातात.या लॉकडाउन मध्ये छोटे मोठे व्यवसाय बंद पडल्या मुळे गोरगरीब मजूर लोकांचे हाल होत आहे.यात रमजान महिन्याचे उपवास पैसे नसल्याने उपवास सोडण्यासाठी लागणाऱ्या वस्तू अन्याच्या कुठून हा प्रश्न पनवेल येथील गरीब मुस्लिम समाजातील लोकांमध्ये उपस्थित ठाकला गेला.अशा या महामारी मध्ये त्या गरीब मजदूर मुस्लिम बांधवांच्या हाकेला धावून आलेले सामाजिक कार्यकर्ते इरफान तांबोळी,तबरेझ कच्छी आणि त्यांचा सर्व ग्रुपने मिळून पवित्र रमजानचे उपवास(रोझा) पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत त्यांना लागणारे सर्व खाद्यपदार्थ तसेच घरात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे काम करत आहे. त्यामुळे लोकात समाधान व्यक्त होत आहे.

तसेच परराज्यातील गरीब मजदूर प्रवासी मुंबई पुणे महामार्गावरून आपल्या गावी पायी जात असल्याची माहिती मिळताच इरफान तांबोळी, तबरेझ कच्छी आणि त्यांची सर्व टीम तेथे जाऊन त्यांना अन्न- दान व पाण्याची व्यवस्था केली.अशा या कठीण व अडचणी प्रसंगी मदत केल्याचे समाधान व्यक्त करीत त्यांनी या विशेष आभार मानले.