जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने मोफत खारपाडा ते माणगावपर्यंत बस सेवा सुरू, संस्थेचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे यांचा पुढाकार
पनवेल दि. १९(वार्ताहर): कोकण येथे पायी जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रशासनाच्या परवानगीने जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने मोफत खारपाडा ते माणगाव पर्यंत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. याचा नागरिकाना मोठा फायदा होताना दिसत आहे.
पनवेल, नवी मुंबई आणि ईतर परिसरातून नागरिक मोठ्या संख्येने कोकणात आपल्या गावी पायी जात आहेत. कोरोनामुळे हाताला काम नाही तसेच जवळचे पैसे देखील संपत आलेले आहेत. त्यामुळे कित्येकानी कोकणात पायी चालत जाण्याचा मार्ग अवलंबला आहे. त्यांच्यासाठी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने मोफत खारपाडा ते माणगावपर्यंत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. नागरिक आपापल्या मूळ गावी परत जाण्यासाठी सरसावले आहेत. या लॉकडाऊन कालावधीत मूळचे कोकणातील परंतु नोकरीनिमित्त मुंबई,ठाणे परिसरात राहणारे अनेक नागरिक आपल्या मूळ गावी येनकेन प्रकारेन परतण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासनाकडूनही ई-पासद्वारे त्यांना त्यांच्या मूळ गावी परतण्यासाठी सहकार्य केले जात आहे. मात्र काहिना पास मिळाला नसल्याने ते पायीच आपल्या गावी निघाले आहेत. एकीकडे परराज्यातील नागरिकांची त्या त्या शहरात राहनारया पोलिस ठाण्यात नावनोंदणी करण्यासाठी मोठ्या रांगा लागत आहेत. तर दुसरीकडे महामार्ग आणि रेल्वे मार्गाने अनेक जण पायी जात असल्याचे दिसून येत आहे. कोकणात पायी चालत जाणारया नागरिकाना गाड़ी भेटत नाही. त्यामुळे ते पायी चालत जात आहेत. चालून चालून काहींच्या पायाला फोड़ आलेले आहेत. मात्र घराच्या ओढ़िने हे नागरिक पायी चालत आहेत. त्यांच्यासाठी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था पुढे सरसावली आहे. यासाठी संपुर्ण बस सेनीटायझर करण्यात आली आहे. ही चांगली सेवा असल्याचे प्रवासी सांगतात. मुंबईहुन देखील काही नागरिक कोकणात निघाले आहेत. अगदी शिस्तबद्ध पद्धतीत नागरिक बसमध्ये येऊन बसत आहेत. दररोज पाच हजार पेक्षा अधिक नागरिक कोकणाच्या दिशेने पायी चालत जात आहेत. जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रितम जनार्दन म्हात्रे आणि माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांच्या वतीने मोफत खारपाडा ते माणगावपर्यंत बस सेवा सुरू केल्याने प्रवासी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेला धन्यवाद देत आहेत.