शासनाच्या हलगर्जी आणि दुर्लक्षामुळे पनवेल तालुक्यातील करोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लवकरात लवकर निर्णय घेऊन कार्यवाही व्हावी अन्यथा भीषण परिस्थिती ला सामोरे जाण्याची वेळ उद्भवेल अशी भीती प्रसाद हनुमंते यांनी व्यक्त केली.
पनवेल : शासनाच्या हलगर्जी आणि दुर्लक्षामुळे पनवेल तालुक्यातील करोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य फार धोक्यात आले आहे. याला जबाबदार शासनाचा निष्काळजीपणा आहे. त्यांचे संरक्षणाच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलिस मित्र व नागरिक समन्वय समितीचे पनवेल तालुका अध्यक्ष प्रसाद हनुमंते यांनी प्रदेश अध्यक्ष श्री दिलीप सवणे यांच्या मार्गदर्शना नुसार ‘ मुंबई तसेच इतर ठिकाणी काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी, कामगार वर्गाचे ते काम करत असलेल्या ठिकाणीच त्यांचे तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करावी ,’ अशी लेखी मागणी शनिवार दि. १६/०५/२०२०रोजी निवेदनाद्वारे मा. मुख्यमंत्री श्री उद्भव ठाकरे यांच्या कडे केली आहे.
करोना सारख्या भीषण महामारीने संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातले आहे. दिवसे गाणिक त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे.अशावेळी काही जिल्हा, तालुका पातळीवर मात्र अभाव दिसत आहे. निश्चितच त्यामागे तेथील महापालिका, नगरपालिका कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर, परिचारिका आणि पोलीस प्रशासन, कर्मचारी यांची अपार मेहनत आहे. त्यांच्या सहकार्या शिवाय करोना विरुद्ध लढणे शक्य नव्हते. परंतु याबाबत काही बाबी मात्र शासनाच्या निदर्शनास येत नसल्याचे दिसून येत आहे.
सद्य स्थितीत पनवेल तालुक्यात आढळून येणारे बहुतांश रुग्ण हे सर्व शासकीय कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, विविध कंपन्या व जास्त करून पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वर्ग आहेत जे मुंबई सारख्या ठिकाणी कामाला आहेत. अश्यांची जर ते काम करत असलेल्या ठिकाणीच निवाऱ्याची, जेवणाची व्यवस्था करण्यात आली तर निश्चितच पनवेल तालुक्यात करोना चा फैलाव होण्यास आळा बसेल.
याबाबत पनवेल चे आमदार मा. श्री प्रशांतजी ठाकूर यांनी शासनास दि.२४/०४/२०२० रोजी लेखी निवेदनाद्वारे सदर बाब लक्षात आणून दिली असून तशी मागणी ही केली आहे. तसेच नगरसेवक श्री नितिन जयराम पाटील (प.म.पा) यांनीही। याबाबत दि ०२/०५/२०२० रोजी मेलद्वारे निवेदन आपणास दिले आहे. परंतु यावर अद्याप कोणतीही कार्यवाही अथवा सूचना करण्यात आल्या नसल्याचे कळते, तसे दिसत आहे. परिणामी असे रुग्ण सातत्याने मुंबई , पनवेल प्रवास करताना त्यांच्या संपर्क प्रदूर्भावाने त्यांचे कुटुंबीय व अन्य नागरिक देखील करोना ग्रस्त होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांमुळे सदर निवेदनावर लवकरात लवकर निर्णय घेऊन अश्या कर्मचारी ,कामगार वर्गाला ते काम करत असलेल्या ठिकाणीच राहण्याची/ निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी जेणे करून करोना सारख्या महाभयंकर रोगावर नियंत्रण करण्यास मदतच होईल. आणि त्यांच्या वर वेळीच इलाज करणे अधिक सोपे होईल व भीषण रोगाचा फैलाव होणार नाही.
आजच्या घडीला करोना विरुद्ध लढताना आपले अनेक शासकीय व पोलीस कर्मचारी ,अधिकारी करोना बाधित झाले आहेत त्यापैकी काही मृत्यूमुखी पडले आहेत. त्यांच्यावर वेळीच उपचार होणे गरजेचे होते. शासन आजून किती लोकांच्या मृत्यू ची वाट बघत आहे. त्यामुळे त्यांची तशी तजवीज केल्यास त्यांना त्याचा सर्वाधिक फायदा होउ शकेल.
पनवेल तालुक्यात दि ०६/०५/२०२० ते १४/०५/२०२० काळात १४० रुग्ण आढळून आले आहेत त्यातील काहींचा मृत्यू झाला आहे. हे सर्व रुग्ण मुंबई येथे कामास असून बहुतेक सर्व पोलीस व शासकीय कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका आहेत. दिवसे गणिक रुग्णच्या संख्येत वाढ होत असून शासनाला जाग येणार आहे का ? का अश्या अधिकारी, कर्मचारी वर्गाला वाऱ्यावर सोडणार आहे ? असे प्रश्नही पोलीस मित्र व नागरिक समन्वय समितीचे पनवेल तालुका अध्यक्ष प्रसाद हनुमंते यांनी उपस्थित केले.
त्यामुळे सादर निवेदनावर लवकरात लवकर निर्णय घेऊन कार्यवाही व्हावी अन्यथा भीषण परिस्थिती ला सामोरे जाण्याची वेळ उद्भवेल अशी भीती प्रसाद हनुमंते यांनी व्यक्त केली.