सायन पनवेल द्रुतगती महामार्गावर कळंबोली येथे खाजगी प्रवासी बस चा अपघात 1 प्रवाशी गंभीर जखमी.. बस मध्ये होते 7 प्रवाशी

पनवेल दि.17 (वार्ताहर)- कर्नाटक मधून मुबई ला प्रवाशी घेऊन चाललेल्या बसचा अपघात झाल्याची घटना सायन पनवेल द्रुतगती महामार्गावर कळंबोली वसाहती जवळ घडल्याचे समोर आले आहे. या अपघातात जखमी झालेल्या सगळ्या प्रवाशांवर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. बस मध्ये 7 प्रवाशी होते त्यापैकी एक प्रवासी जखमी झाल्याचे पोलीस विभागाकडून सांगितले जात आहे.

कर्नाटक मधून ka 51 AA 2013 या खाजगी ट्रॅव्हलर मधून 7 प्रवाशी हे मुबई च्या दिशने शनिवारी निघाली होती, ही खाजगी ट्रॅव्हलर सायन पनवेल द्रुतगती महामार्गावरील कळंबोली वसाहती जवळ आली त्याच वेळी, या महामार्गावर रस्त्याच्या डाव्या बाजूला mh 04 G 9251 ही खाजगी बस बंद अवस्थे मध्ये उभी होती. त्याच वेळी मुबई च्या दिशेने चाललेल्या ट्रॅव्हलर ने या बंद बस ला मागून जोरात धडक दिली हा अपघात एवढा भयंकर होता की गाडीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या वेळी ट्रॅव्हलर बस मध्ये 7 प्रवाशी प्रवास करत होते. त्या पैकी 1 प्रवाशी जखमी झाले आहे त्याच्यावर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *