पनवेल महापालिका आयुुक्तांच्या दुकाने सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत व्यापारी संघटना आणि जनतेमध्ये समाधान
पनवेल दि. 13 (वार्ताहर)- पनवेल महापालिकेचे कार्यतत्पर आणि कोरोना व्हायरस विरुद्ध योेग्य प्रकारच्या उचललेल्या पावलामुळे पनवेल शहरात कोरोनाचे नियंंत्रण करण्यासाठी ते यशस्वी ठरलेे आहेत. त्यांच्या योेग्य नियोजनामुळे पनवेल महापालिकेच्या हद्दीतील कोरोना रुग्ण आटोक्यात आले असून त्यामुळेच शहरातील व्यापार्यांना अनेक दिवसापासूून बंद असलेली दुकाने नियमांप्रमाणे व ठरलेल्या दिवसांप्रमाणे उघडी करण्याचे त्यांनी आदेश 2 दिवसांपूर्वी दिल्यामुळे व्यापारी वर्गात आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहेे.
गेले दोन महिन्यामध्ये देशभरात कोरोनाने थैैमान घातलेे असताना कोरोेनाचेे रुग्ण वाढीस लागल्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन केला. त्याचबरोबर राज्य सरकारचा लॉकडाऊन संपत नाही त्यापूर्वीच केंद्र शासनाने लॉकडाऊन पुन्हा जाहीर करून कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमडून पडली. त्यावर कोरोनामुक्त होण्यासाठी राज्यातील सरकार आणि शासकीय अधिकार्यांंनी प्रयत्नांची पराकाष्टा सुरू ठेेवली. त्यामध्ये महसूल अधिकारी, त्याचबरोबर महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेेने आपले प्रयत्न चालू ठेवून कोरोना नियंंत्रणात आणण्यासाठी भर दिला. परंतु पनवेेल महापालिकेच्या हद्दीत बाहेरुन मुंबईमधून येेणार्या-जाणार्या नागरिकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागला होेता. त्यावर महापालिकेच्या हद्दीत कोरोनापासूून नियंत्रण ठेेवण्यासाठी पनवेेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी आपल्या कर्मचार्यांसह व अधिकार्यांसह प्रयत्नांची पराकाष्टा करून तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पनवेेल शहरात कोरोनाचा प्रादुुर्भाव कमी झाल्यामुळे पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी लॉकडाऊन काळात बंद असलेली दुकाने पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न करून ती दुकानेे सुरू केली. त्यामुळे व्यापारी वर्गात व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.