जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केली रिक्षा चालकांना आर्थिक मदत.

जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केली रिक्षा चालकांना आर्थिक मदत
पनवेल दि.११ (वार्ताहर)- शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड पनवेल शिरीष घरत यांनी खारघर शहरातील संतोष हरिश्चंद्र पवार यांचा कोरोना काळात बंद पडलेला रोजगार आर्थिक सहाय्य करून सुरू करून दिला.
खारघर शहरातील संतोष हरिश्चंद्र पवार हे आपला रिक्षा चालवून उदर निर्वाह करत होते. परंतु मागील कोरोंना काळात त्यांचा रोजगार बंद झाल्यामुळे त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची भेट घेऊन, आपली व्यथा मांडली. सध्याची परिस्थिती पाहता, विलंब न लावता जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी आर्थिक सहाय्य करून, त्यांचा बंद पडलेला रीक्षा चा व्यवसाय पुनः सुरू करून दिला व शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, महानगर समन्वयक गुरूंनाथ पाटील, शाखाप्रमुख सचिन ठाकुर, गिरिष गुप्ता आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *