पनवेल मध्ये फक्त महिलांसाठी रंगपंचमी होणार.

क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे रंगपंचमीचे आयोजन.
महिलांसाठी रंगापंचमीचे आयोजन. अध्यक्षा सौ.रूपालिताई शिंदे यांचा अनोखा उपक्रम. पनवेल /प्रतिनिधी : पनवेलमधील महिलांसाठी अग्रेसर असणाऱ्या क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे रंगपंचमी इव्हेंट सेलिब्रेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा सौ रुपालीताई शिंदे यांनी या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून नवीन पनवेल सेक्टर 16 पिल्लाई गर्ल्स हॉस्टेलच्या बाजूला असलेल्या मैदानावर या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार 22 मार्च रोजी ,सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत हा कार्यक्रम होणार असून यामध्ये लाईव्ह डीजे तसेच फन गेम्स देखील असून वेलकम ड्रिंक देखील ठेवले आहे यासाठी प्रवेश फि 100 रुपये ठेवली असून महिला एकत्रित होऊन नैसर्गिक रंगाने रंगपंचमी साजरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रथमच असा इव्हेंट पनवेल मध्ये होत आहे हा इव्हेंट फक्त महिलांसाठी आयोजित केले असून महिलांनी जास्तीत जास्त संख्येने यात सहभागी व्हावे. प्रवेशासाठी 8652414343 या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन रूपालिताई शिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.