ठाणा नाका येथील नागरिकांसाठी लवकरच सुरू होणार ओपन “जिम”

ठाणा नाका येथील नागरिकांसाठी लवकरच सुरू होणार ओपन जिम”विभागातील पाण्याच्या टाकीच्या कामाची प्रितम म्हात्रे यांनी केली पाहणी”पनवेल : ठाणा नाका येथील पायोनियर विभागात भूखंड क्रमांक 114 या ठिकाणी स्थानिक नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीमधून नागरिकांच्या मागणीनुसार ओपन जिम चे काम सुरू झाले होते त्या कामाची पाहणी करण्यासाठी श्री.प्रितम म्हात्रे यांच्यासोबत नगरसेविका डॉक्टर सौ सुरेखा मोहोकर नगरसेविका सौ प्रीती जॉर्ज उपस्थित होत्या. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे अधिकारीश्री.कटेकर, श्री.कर्डीले(बांधकाम विभाग ) श्री.विलास चव्हाण ,श्री. तायडे ( पाणी पुरवठा ) यांच्याशी सुरू असलेल्या कामाबद्दल त्यांनी चर्चा केली.        यावेळी श्री.प्रितम म्हात्रे यांनी ओपन जिम संदर्भात सुरू असलेल्या कामामध्ये काही सूचना केल्या जेणेकरून भविष्यात त्या प्लॉटवर होणाऱ्या गार्डन आणि इतर विकासाच्या वेळी ओपन जिम चा अडथळा होणार नाही. त्या प्लॉटवर प्रभागातील अभिनव युवक मित्र मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने आणि जल्लोषाने साजरा करण्यात येतो सदर विकासकामांच्या वेळी त्या दृष्टीनेसुद्धा उपाय योजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जेणेकरून उत्सवाच्या वेळी जागेचे नियोजन व्यवस्थित होईल.       या भूखंडावर स्थानिकांसाठी गार्डन असावे यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत त्या गार्डन संदर्भातील आराखडा बनवून तो त्वरित दाखवण्यात यावा अशी सूचना यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. या ठिकाणी सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम पूर्णत्वास आलेले आहे जे काम बाकी आहे ते युद्धपातळीवर पूर्ण करून नागरिकांना भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची तक्रार लवकर निकाली काढा असे त्याने सांगितले.
कोट:- सदर पाण्याची टाकी पाठपुरावा करून आम्ही लवकरच सुरू करून घेऊ,जेणेकरून या टाकीच्या माध्यमातून मिळणाऱ्या पाण्यामुळे ठाणा नाका,लोखंडी पाडा,अशोक बाग परिसरातील पाण्याचा प्रश्न निकाली निघेल.:- श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे ,विरोधी पक्ष नेते, पनवेल महानगरपालिका

Leave a Reply

Your email address will not be published.