पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविडचे रुग्ण शून्य.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविडचे शून्य रूग्ण
पनवेल महापालिकेचे कोरेाना मुक्तीकडे वाटचाल

पनवेल,दि,14: गेल्या दोन वर्षापासून पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात पहिल्यांदा (14 मार्च) कोविड रूग्णसंख्या शून्य झाली आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटाने सर्वत्र थैमान घातले होते. मात्र मागील काही दिवसापासून कोविडच्या रूग्ण संख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. आज शेवटी रूग्णसंख्या शून्य झाल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्र कोरोना मुक्तुक्तीकडे वाटचाल होतअसल्याचे चित्र दिसत आहे.
कोविड 19 विषाणूचा प्रादुर्भाव पनवेल महापालिका परिक्षेत्रात रोखण्यामध्ये आयुक्त श्री.गणेश देशमुख यांचे भरीव योगदान लाभले आहे. कोविडच्या सुरूवातीच्या काळात अपुऱ्या आरोग्य सेवासुविधांमध्ये देखील योग्य नियोजन आणि योग्य निर्णय घेऊन आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी कोविडची रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात यश मिळवले आहे.
कोविडच्या पहिल्या लाटेत महापालिकेकडे पुरेशा आरोग्य सेवा नव्हत्या त्यावेळी शासनाकडून उपजिल्हा रूग्णालय तसेच एमजीएम रूग्णालय,डी.वाय पाटील रूग्णालय, काही काळ सुअस्थ रुग्णालय याठिकाणी कोविडच्या रूग्णांवर उपचार करण्यात आले. त्याचवेळी ग्रामविकास भवन त्यानंतर खारघर येथे देवांशी आणि टिआरा ,कोन येथील इंडिया बुल्स याठिकाणी क्वारंटाईन सेंटर करण्यात आले. याठिकाणी सौम्य् लक्षणे असणाऱ्या कोविड रूग्णांना क्वारंटाईन करण्यात आले.
दुसऱ्या लाटेच्यावेळी कोविड रुग्णांवर उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालय ,एमजीएम रूग्णालय यांच्याबरोबरच पालिकेला स्वत:च्या हक्ककाचे कळंबोली येथे 72 खाटांचे कोविड रुग्णालय मिळाले. कोरोनाची तिसरी लाट आल्यास पनवेल महापालिका क्षेत्रासह रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून रूग्ण याठिकाणी उपचारास येण्याची शक्यता असल्याने तिसऱ्या लाटेत भारतीय कापूस निगम येथील 650 खाटांचे जंबो कोविड सेंटर तयार करण्यात आले. येथे औषधे, ऑक्सीजन पुरवठा, आयसीयू खाटां या सर्वांची पालिकेच्यावतीने सोय करण्यात आली होती.
महापालिकेने सुरूवातीपासूनच टेस्टींग, ट्रीटमेंट, व्हॅक्सीनेशनवर भर दिला होता. कोविडच्या पहिल्या लाटेत सुरवातीला टेस्टींगच्या सहा टिम होत्या त्या वाढवित तिसऱ्या लाटेत 18 मोबाईल टिम करण्यात आल्या. त्यामध्येही नंतरच्या काळात दुप्पट कर्मचारी देण्यात आले. रूग्णांची संख्या ज्यावेळी अधिक होती त्याकाळात एके दिवशी पालिकेच्यावतीने साडेतीन हजार ते पाच हजार टेस्ट केल्या जात होत्या. याबरोबरच सहा फिवर क्लिनीक काम करीत होत्या.
कोरोनाच्या या संकटात लसीकरण हे मोठे कवच असून पालिका क्षेत्रातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्यावतीने आयुक्त श्री. देशमुख सातत्याने आवाहन करत होते. कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने आयुक्तांच्या निर्देशानूसार शहरी भागाबरोबरच महापालिकेने ग्रामीण भागांवर लक्ष केंद्र केले. ग्रामीण भागात 68 ठिकाणी लसीकरणासाठी 10 पथकाची निवड करण्यात आली. ही पथके ग्रामीण भागात आठवड्यातील ठराविक दिवशी लसीकरण कार्यक्रम राबवित होती. सद्य परिस्थितीत पालिका क्षेत्रात दोन्ही डोसचे लसीकरण 110 टक्के झाले आहे.
कोविडची शून्य रुग्णसंख्या आणण्यामध्ये पालिका क्षेत्रातील सर्व नागरिक, पालिकेचे सन्मानीय सर्व सदस्य तसेच महापालिकेच्या विविध विभागाबरोबरच उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी आणि पालिकेचे सर्व वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी या सर्वांचे महत्वाचे योगदान लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.