पनवेल महापालिकेचे पर्यावरणपूरक होळी करण्याचे आवाहन.
पनवेल महापालिकेचे पर्यावरणपूरक होळी करण्याचे आवाहन
पनवेल,दि.14: पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी पर्यावरण पूरक हेाळी करावी असे आवाहन आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी आवाहन केले आहे. होळीत होणारी साधनसंपत्तीची हानी व त्यातून होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक होळी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी छोटी होळी करा,तसेच होळीत प्रथा म्हणून पोळी टाकण्या ऐवजी त्या पोळीचे गरजूंना दान केले जावे. तसेच नागरिकांनी होळी साठी वृक्ष तोड करू नये, धुलिवंदन दिवशी नैसर्गिक रंगाचा वापर करून आरोग्याची काळजी घ्यावी, पाण्याची काटकसर करावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.