होर्डिंगचे ठेकेदार जोरात,वॉर्ड ऑफिसर कोमात .

पनवेल महापलिका नक्की कोण चालवतेय ? सत्ताधारी, प्रशासन कि ठेकेदार. रात्रीच्या वेळेस होर्डिंगचे बांधकाम सुरु. अनधिकृत होर्डिंगवर कारवाई कधी? पनवेल महापालिकेच्या भ्रष्ट्राचाराची महती संपूर्ण पनवेलकरांना हळू हळू का होईना माहिती पडत आहे. वॉन्टेड पिक्चरमधील हाय लेवलके झोल अपने समजमे नही आते हा डायलॉग अगदी पनवेलच्या नागरिकांना योग्य ठरतो कारण सत्ताधारी प्रशासन आणि विरोधक हे आपापसात मिळून सर्व गिळून खाऊ अशी भूमिका ठेवत असल्याने कोणताही भ्रष्टाचार कोणत्याही माई का लालने पुराव्यासहित पनवेलच्या नागरिकांसमोर ठेवलेला नाही. पनवेलच्या नागरिकांना गृहीत धरण्याचे काम केले जात आहे. नुकताच पनवेल महालिकेच्या परवाना विभागाचा झोल सध्या दिसून येत असून सर्वसामान्य अपंग लोकांच्या दुकानावर किंवा घरावर कारवाई करताना छाती फुगवणारे अतिक्रमण अधिकारी अमर पाटील हे मात्र धनदंडग्या व राजकीय वरदहस्त असलेल्या लोकांच्या अतिक्रमणावर मात्र मूग गिळून गप्प आहेत. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आल्वेज ऍडव्हरटायसिंग या कंपनीचे बेकायदेशीर होर्डिंगचे बांधकाम सुरु आहे याबाबत संबंधित व्यक्तींशी चर्चा करून परवानगी आहे का विचारले असता सकाळी देतो आता काम थांबावतो असे उत्तर देण्यात आले मात्र हे काम कोणाच्या आदेशाने सुरु होते? शनिवार रविवार पालिकेला सुट्टी असताना रात्रीचे हे काम का सुरु होते? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे तरी पनवेल महापलिका आयुक्त यांनी याबाबत कडक कारवाईचे धोरण राबवावे व संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ दुसऱ्या विभागात बदली करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.