सामाजिक कार्यकर्ते सुधीर सुर्वे यांचा करण्यात आला विशेष सत्कार.
सामाजिक कार्यकर्ते सुधीर सुर्वे यांचा करण्यात आला विशेष सत्कार
पनवेल, दि.10 (संजय कदम) ः पनवेल तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सुधीर सुर्वे यांचा विशेष सत्कार आज पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्रमात करण्यात आला.
पोलीस आयुक्तालय नवी मुंबई यांच्या तर्फेआझादी का अमृत महोत्सव सांप्रदायिक सलोखा चर्चा सत्र कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात दत्त भक्त समाज सेवक सुधीर सुर्वे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच त्यांनी केलेल्या आतापर्यंत कार्याचे कौतुक परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी करून यापुढे सुद्धा त्यांनी समाजासाठी आपले कार्य सुरूच ठेवावे अशा शुभेच्छा दिल्या.