साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते रविवारीओंजळीतील शब्दफुले काव्यसंग्रहाचे प्रकाशनकोमसाप नवीन पनवेल शाखेचा उपक्रम.

साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते रविवारी
ओंजळीतील शब्दफुले काव्यसंग्रहाचे प्रकाशन
कोमसाप नवीन पनवेल शाखेचा उपक्रम ….
पनवेल … रायगड, नवी मुंबईतील कवींच्या कविता असलेला ओंजळीतील शब्दफुले या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेतर्फे करण्यात आले आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी संपादन केलेल्या ओंजळीतील शब्दफुले या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दि.१३ मार्च २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता पनवेलच्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृह, मार्केट यार्ड येथे होत आहे.
या कार्यक्रमाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनंसपर्क प्रमुख रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील, कोमसापचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधीर शेठ, ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख, कोमसापचे रायगड जिल्हा माजी अध्यक्षा सुनिता जोशी, रायगड जिल्हा कोमसापचे संजय गुंजाळ, सुखद राणे, अ‍ॅड. गोपाळ शेळके, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी उपस्थित राहणार आहेत.
या प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांची प्रकाशित तसेच रायगडमधील कवी आणि साहित्यिक यांच्या प्रकाशित झालेल्या पुस्तकांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित शाखा अध्यक्ष तसेच नवीन पनवेल शाखेच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.