पनवेल चे नामवंत गायक (आईचा सोहळा फेम ) मुकेश उपाध्ये यांना रायगड भूषण 2020-21 पुरस्काराने सन्मानित.

पनवेल चे नामवंत गायक (आईचा सोहळा फेम )
मुकेश उपाध्ये यांना रायगड भूषण 2020-21 पुरस्काराने सन्मानित
पनवेल दि.६ (संजय कदम)- पनवेल चे नामवंत गायक (आईचा सोहळा फेम )
मुकेश उपाध्ये यांनी पनवेल सह नवी मुंबई, मुंबई व रायगड जिल्ह्यातील कलाकारांसाठी गेल्या दोन वर्षांत कोव्हिड काळात केलेल्या उल्लेखनीय कामांची दखल रायगड जिल्हा परिषदेने घेऊन आज त्यांना रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
रायगड भूषण हा अत्यंत मानाचा पुरस्कार आहे हा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्तीकडून रायगड जिल्ह्यासाठी अधिक जोमाने काम करण्याची अपेक्षा आहे. अशी अपेक्षा रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या रायगड भूषण पुरस्कार वितरण समारंभामध्ये राज्याच्या उद्योग पर्यटन राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष योगिता पारधी महाराष्ट्र राज्याच्या माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील माजी आमदार पंडित पाटील विद्यमान आमदार बाळाराम पाटील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.