सिटी बेल वृत्तसमुहाने केला ग्रंथसेवा देणाऱ्या महिलांचा सत्कार

सिटी बेल वृत्तसमुहाने केला ग्रंथसेवा देणाऱ्या महिलांचा सत्कार .

  वाचन संस्कृतीचे जतन करण्यासाठी, किंबहुना तिचे संवर्धन करण्यासाठी ज्या महिला कर्मचारी झटत आहेत त्यांचा सिटी बेल आणि सोसायटी किंग्डम यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या औचित्याने सत्कार करण्यात आला. पनवेल नगरीतील ऐतिहासिक के गो लिमये वाचनालयाच्या ग्रंथपाल निकिता महेश शिंदे यांचा व त्यांच्या महिला सहकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
     सिटी बेल वृत्त समूहाचे समूह संपादक मंदार दोंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. अस्तंगत पावत असलेल्या वाचन संस्कृतीचे संवर्धन ही काळाची गरज आहे. कितीही आधुनिक तंत्र प्रगत शास्त्र आली तरीदेखील पुस्तकवाचन माध्यमातून ज्ञानार्जन करणे हा प्रकार कालबाह्य होणार नाही. के गो लिमये वाचनालयाच्या माध्यमातून ग्रंथ सेवा देत असलेल्या महिलांचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे असे ते म्हणाले. ग्रंथालयाच्या अध्यक्षा सुनीता जोशी यांनी सिटी बेल आणि सोसायटी किंगडम संस्था करत असलेल्या या उपक्रमाची प्रशंसा केली. वाचन संस्कृती संवर्धन करता सेवाभावी संस्थांनी अशा प्रकारे पुढे आल्यास त्याचे निश्चित स्वागत होईल असे त्या आपल्या मनोगतात म्हणाल्या. सचिव काशिनाथ जाधव यांनी सिटी बेलचे समूह संपादक मंदार दोंदे आणि समूह संपादक विवेक पाटील तसेच सोसायटी किंग्डमचे संस्थापक अध्यक्ष वैभव सोनटक्के यांचे या उपक्रमाबद्दल आभार मानले.
  ग्रंथ सेवा देणाऱ्या महिलांच्या सत्कार समारंभाला ग्रंथालयाच्या अध्यक्ष सुनीता जोशी, कार्याध्यक्ष श्री वत्सराज, सचिव काशिनाथ जाधव, सिटी बेलचे समूह संपादक मंदार दोंदे, समूह संपादक विवेक पाटील, ग्रंथपाल निकिता महेश शिंदे, राधिका सुनील साठे, संजय दिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.