पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांचा केला श्री काळभैरव मंगल कार्यालय ग्रामस्थ समर्थ महिला मंडळा तर्फे सत्कार पनवेल.

पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांचा केला श्री काळभैरव मंगल कार्यालय ग्रामस्थ समर्थ महिला मंडळा तर्फे सत्कार पनवेल दि,०८(वार्ताहर):पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांचा कळंबोली येथील श्री काळभैरव मंगल कार्यालय ग्रामस्थ समर्थ महिला मंडळा तर्फे सत्कार स्थानिक नगरसेवक रवींद्र भगत यांच्या पुढाकाराने कऱण्यात आला. 
        गेल्या चार वर्षापासून सातत्याने श्री काळभैरव मंगल कार्यालय ग्रामस्थ समर्थ महिला मंडळ यांच्याकडे हस्तांतर करण्यात यावा अशी मागणी नगरसेवक रवींद्र भगत यांनी महानगरपालिकेकडे केल्या नंतरही हस्तांतरणाबाबत नकारात्मक भूमिका असल्याने 19 जुलै 2021 रोजी पनवेल महानगरपालिका कळंबोली वार्ड ऑफिस या ठिकाणी सलग चार दिवस बेमुदत उपोषण केल्यानंतर लेखी स्वरूपात देण्यात आलेले पत्राद्वारे आज महासभेच्या ऑनलाईन सभेमध्ये श्री काळभैरव मंगल कार्यलय हस्तांतर करण्याच्या प्रस्थावाला एक मताने मंजुरी देण्यात आली.त्यानंतर कळंबोली ग्रामस्थ  मंडळ व महिला मंडल यांच्या वतीने नगरसेवक रविंद्र अनंत भगत यांचा सत्कार करण्यात आला तसेच मिठाई वाटुन आंनद साजरा करण्यात आला. तसेच  कळंबोली कालभैरव मंगल कार्यालय ग्रामस्थ समर्थ महिला मंडळाचा प्रस्ताव महानगरपालिकेने मंजूर केल्याबद्दल आयुक्त गणेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. फोटो:आयुक्त गणेश देशमुख यांचा करण्यात आलेला सत्कार.

Leave a Reply

Your email address will not be published.