ना.नबाव मलिक यांच्यावरील ईडीच्या गैरकारवाईबाबत राष्ट्रवादीने काढला मोर्चा.

ना.नबाव मलिक यांच्यावरील ईडीच्या गैरकारवाईबाबत राष्ट्रवादीने काढला मोर्चा
पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक यांच्यावर ईडीचा गैरवापर करून केंद्र सरकारने केलेल्या कारवाईबाबत आज पनवेलमधील प्रांत कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील व जिल्हा उपाध्यक्ष आर.एन.यादव यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने आज सकाळी ठाणा नाका ते प्रांत कार्यालय पनवेल असा मोर्चा काढून यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ताहिर पटेल, महिला आघाडीच्या शशिकला सिंह, अमिता चौहान, विद्या चव्हाण, सुनील मोहोड, विजय मयेकर, संजय परब, नेहा पाटील, बळीराम नेटके, दर्शन ठाकूर, परशुराम सुरते, अमित लोखंडे, महादेव पाटील, प्रसाद पिंगळे, जितेंद्र यादव आदींसह मोठ्या प्रमाणात शेकडो संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कोट
केंद्रीय तपास यंत्रणा (ईडी) महाराष्ट्रात सातत्याने सत्ताधारी पक्षातील राजकीय व्यक्तींवर वारंवार सुडबुद्धीने कारवाई करीत आहे. परंतु ही कारवाई निपक्षपाती होणे गरजेचे आहे. ः सुदाम पाटील, प्रदेश सरचिटणीस
कोट
अशा प्रकारच्या कारवाया म्हणजे चुकीचे राजकारण सुरू आहे ते केंद्राने त्वरित थांबवावे. जो कोणी केंद्र व विरोधी पक्षाविरोधात आवाज उठवितो त्याचावर ईडीची कारवाई करण्यात येते हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी घातक आहे ः आर.एन.यादव, जिल्हा उपाध्यक्ष
चौकट
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या निषेध मोर्चाला मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यातून पनवेल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद दिसून आली. यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. असे असले तरी पक्षातील महत्वाच्या पदाधिकार्‍यांनीच या निषेध मोर्चाकडे पाठ फिरविल्याने याची चर्चा मोर्चात होती.

Leave a Reply

Your email address will not be published.