अनेक अडचणीवर मात करून युक्रेनमधून परतली प्रचिती पवार भारतात.

अनेक अडचणीवर मात करून युक्रेनमधून परतली प्रचिती पवार भारतात
पनवेल, दि.2 (संजय कदम) ः युक्रेनमध्ये युद्धाची भयावह स्थिती असतानाही लहान वयात सुद्धा अनेक अडचणींना मात करीत अखेरीस पनवेलजवळील करंजाडे वसाहतीमध्ये राहणारी प्रचिती पवार ही अखेरीस आपल्या घरी परतल्याने तिच्या कुटुंबियांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला.
प्रचिती दिपक पवार ही एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेली होती. ती सध्या इव्हानो फ्रान्सक्रिस मेडीकलमध्ये शिकत होती. 2019 साली तेथे शिक्षणासाठी गेली होती व तेथील एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. अचानकपणे 7 दिवसापूर्वी रशिया व युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले. परंतु पश्‍चिम क्षेत्रात राहत असल्याने याबद्दल तिला एवढी काही माहिती नव्हती. अचानकपणे तिच्या बहिणीचा तिला फोन आला व तुमच्या भागात युद्ध सुरू झाल्याची माहिती तीने दिली. परंतु यावेळी सुद्धा तिला खरे वाटले नाही. त्यामुळे तीने तिच्या मैत्रिणीशी संपर्क साधला असता तिला युद्धाची माहिती मिळाली व येथील परिस्थिती चिघळत चालल्याचे समजले. युद्धामुळे पवार कुटुंबिय सुद्धा करंजाडेमध्ये हवालदिल झाले होते व ते सातत्याने तिच्या व तिच्या मैत्रिणीच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत होते. व लवकरात लवकर कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरी या असे सांगत होते. युद्ध सर्वत्र पसरत गेले. त्यामुळे त्यांच्यामध्ये भितीयुक्त वातावरण आहे. यावेळी प्रचिती व भारतात राहणार्‍या तिच्या सहकार्‍यांनी एकत्रित येवून या संकटाला तोंड देण्याची भूमिका घेतली. 24 फेब्रुवारीला त्यांना खारकिव्ह आणि किव्हमध्ये युद्ध जोरात सुरू झाले होते. तसेच ती राहत असलेल्या शहरातील विमानतळ उडविण्यात आल्याने अत्यंत बिकट परिस्थितीत झाली होती. त्यातच तेथील सरकारने 25 तारखेला भारतात परतण्यासंदर्भात त्यांना सुचना देण्यात आल्या. त्यानुसार त्यांनी परतीची तयारी सुरू केली. तेथील सरकारी अधिकार्‍यांच्या मदतीने त्यांच्या ग्रुपने खाजगी बस करून 50 जणांनी रोमानियाच्या बॉर्डरच्या अलिकडे थांबा घेतला. बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात परतीची गर्दी असल्याने त्यांची बस तेथे जावू शकत नसल्याने ते सर्वजण तेथेच उतरले व त्यांनी 15 ते 20 कि.मी. चालत जावून बॉर्डर गाठली. यावेळी तेथील सरकारने प्रत्येकाला  भारत देशाचे झेंडे लावण्यास सांगण्यात आले होते. त्यांना 15 ते 20 मिनिटे गेटच्या बाहेरच ठेवण्यात आले. नंतर रांगेत उभे करण्यात आले व आतमध्ये जावून देण्यात आले. व 8 ते 9 तास कागदपत्रे तपासणी व इतर सोपस्कारमध्ये गेली. यावेळी त्यांना रोमानियाच्या सरकारने सुद्धा मदत केली व तेथून भारताच्या एमबीसीने सुद्धा मदत केली. कडाक्याची थंडी, अन्न पुरवठा कमी, पाणी कमी या स्थितीतही या मुलींनी कोणत्याही परिस्थितीत मायदेशी परतायचा हा निर्धार केला होता. या सर्व संकटाचा सामना करत तीने अखेरीस विमानतळ गाठले. देशाने या विद्यार्थ्यांच्या संपर्कांत राहून त्यांच्या परतीसाठी व्यवस्था केली होती. परंतु हीच व्यवस्था एमबीसीने युक्रेनच्या बॉर्डरपर्यंत केली असती तर अजून लवकर कित्येक मुले भारतात परतली असती, असे या परतणार्‍या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. आजही खुप मुले ताटकळत तेथे बसली आहेत. त्यातच परिसरात होत असलेले कानठळ्या बसविणारे बॉम्ब हल्ले त्यामुळे वातावरण सर्वत्र भितीयुक्त आहे. अनेकजण बंकर्स व मेट्रोमध्ये आश्रयास राहिले आहेत. तरी देशाने याबाबत अजून पुढाकार घेवून लोकांना बॉर्डरवरुन आपल्या देशामध्ये आणण्यासाठी यंत्रणा सज्ज करावी, असे त्यांचे मत आहे. प्रचिती पवार जेव्हा मायदेशी परतले तेव्हा पवार कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. आज प्रचितीला आपण घरी परतल्याचा आनंद आहे. परंतु तिच्या बरोबर त्या ठिकाणी शिक्षण घेणारे अजून आपल्या देशातील मित्र मंडळी तेथे अडकल्याने ते सुद्धा लवकर परतावे हिच तिची इच्छा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.