वृध्द इसम बेपत्ता.
वृद्ध इसम बेपत्ता
पनवेल, दि.2 (संजय कदम) ः 73 वर्षीय वृद्ध इसम कळंबोली येथील राहत्या घरातून बेपत्ता झाल्याने ते हरविल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
रामाधार चुलहाई सिंग (73 रा.सेक्टर 17, रोडपाली, कळंबोली) उंची 5 फुट 3 इंच, रंग गहुवर्णीय, मजबूत बांधा, डोक्याच्या समोरील बाजूस टक्कल असून उजव्या बाजूस वाकून चालतात. अंगामध्ये पांढरंट रंगाचे हाफ शर्ट आणि काळ्या रंगाची साधी पॅन्ट घातलेली आहे. त्यांना हिंदी भाषा अवगत आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कळंबोली पोलीस ठाणे किंवा पो.ना.सुनील मासुळ यांच्याशी संपर्क साधावा.