पनवेल जवळील पळस्पे येथील उड्डाण पुलाखाली महाऑटो शोरुमच्या समोर असलेल्या फुटपाथवर आढळला मृतदेह .

उड्डाण पुलाखाली आढळला मृतदेह
पनवेल, दि.2 (संजय कदम) ः पनवेल जवळील पळस्पे येथील उड्डाण पुलाखाली महाऑटो शोरुमच्या समोर असलेल्या फुटपाथवर एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
सदर इसमाचे अंदाजे वय 35 ते 40 वर्षे, उंची सुमारे 5 फुट, वर्ण सावळा, चेहरा उभट, नाक लांबट, केस काळे व पांढरे, दाढी काळी व पांढरी असून अंगात पांढर्‍या रंगाचा रेषा असलेल्या शर्ट व काळ्या रंगाची हाफ पॅन्ट परिधान केली आहे. तसेच त्या ठिकाणी अपंग व्यक्ती वापरतात ती सायकल आढळून आली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पो.उपनिरीक्षक लाला लोणकर यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published.