खारघर शहर शिवसेना युवक रोजगार व स्वयं रोजगार विभागातर्फे,रोजगार मेळावा संपन्न.

खारघर शहर शिवसेना युवक रोजगार व स्वयं रोजगार विभागातर्फे, रोजगार मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद
पनवेल दि.27 (संजय कदम)- कोरोंनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी गरजू मुलांना नोकरीची सुवर्णसंधी देण्याकरिता, खारघर शहर शिवसेना युवक रोजगार व स्वयं रोजगार विभागातर्फे, रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.        यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्यासह जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, महानगर समन्वयक गुरूनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, आयोजक उपशहरप्रमुख मंगेश रानावडे, विभाग प्रमुख इम्तियाज शेख, तसेच उपशहरप्रमुख नंदू वारुंगसे, उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत व शिवसैनिक आदि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी 250 हून जास्त गरजू तरूणांनी सहभाग घेतला होता. त्यातील 100 पेक्षा जास्त तरूणांना या मेळाव्याच्या माध्यमातून चांगल्या कंपनीत नोकरी प्राप्त झाली आहे. तसेच उर्वरीत तरूणांनासुद्धा लवकरच नामांकीत कपंन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार असल्याची माहितीआयोजक उपशहरप्रमुख मंगेश रानावडे यांनी दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published.