महाराजांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज कळंबोली यांच्या वतीने एक दिवशी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

कळंबोली येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण
नवीन पनवेल ता.27(वार्ताहर) गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले असून त्यांनी बमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. मुंबईच्या आझाद मैदानात संभाजीराजे भोसलेंनी उपोषणाला सुरुवात केले आहे. महाराजांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज कळंबोली यांच्या वतीने कळंबोली येथील पोलिस निवारा चौक या ठिकाणी एक दिवशी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
या वेळी उपोषण कर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या व आरक्षणाच्या संदर्भात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच शिवछत्रपतींच्या नावाचा जयघोष करण्यात आला. या वेळी सकल मराठा समाज कळंबोली चे नेते रामदास शेवाळे, किरण नागरगोजे, अवधूत साळुंखे,जोतिराम साळुंखे, महादेव क्षीरसागर, श्रीकांत फाळके, शुभम गोडसे, संभाजी चव्हाण, शरद पवार, निलेश दिसले,सागर मोरे,नाना पवार, निलेश टाकळकर यांच्या सह अनेक नागरिक उपोषणाला बसले होते.
जे समाज बांधव उपोषणाला आझाद मैदानावर हजर राहू शकत नाहीत अशा नागरिकांसाठी हे लाक्षणिक उपोषण केले असल्याची माहिती सकाल मराठा समाज कळंबोली चे नेते रामदास शेवाळे यांनी या वेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.