मोठी जुई येथे कवितांचा जागर.
मोठी जुई येथे कवितांचा जागर
पनवेल दि.26 (वार्ताहर)- पीएन.पी विद्यालयात राजभाषा मराठी दिनाच्या पूर्व संध्येला कोकण मराठी साहित्य परिषद उरण, यांच्या वतीने पी एन पी विद्यालय मोठी जुई येथे कवितांचा जागर करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ सदस्य रायगडभूषण प्रा.एल बी.पाटील, ज्येष्ठ कवी ए.डी पाटील, शाळेचे चेअरमन नामदेव पाटील,व्हाईस चेअरमन रमाकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.कोमसाप शाखाध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे यांनी सुरेख सूत्रसंचालन केले.
कवितांचा जागरमध्ये कवी लोकशाहीर मोरेश्वर म्हात्रे, रंजना केणी, भ.पो.म्हात्रे, अमोल म्हात्रे, भरत पाटील, तन्वी भोपी, मानसी पाटील यांनी कविता वाचून आनंद दिला. यावेळी शाळेतील विद्यार्थी यश भगत, रुषभ पाटील, श्रुती पाटील, स्नेहा भोईर, नियती कोळी यांनी ही स्वरचित रचना सादर केल्या. मुख्याध्यापक किशोर पाटील, रजनी तांडेल, नामदेव ठाकरे, शशिकांत पाटील, रवींद्र कदम, उत्तम पाटील आणि ग्रामस्थांची विशेष उपस्थिती होती. प्रास्ताविक रंजना मोकल यांनी केले.