पनवेल मध्ये महीला क्रिकेट मॅच.

महिला दिनाचे औचित्य साधून क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन यांच्या वतीने एक दिवस जल्लोषाचा महिलांचे क्रिकेट सामने (फक्त महिलांसाठी) फॉउंडेशन च्या अध्यक्ष सौ. रुपाली शिंदे यांच्या आयोजनाने दि. १२ मार्च २०२२ रोजी सुकापूर नवीन पनवेल याठिकाणी आयोजित करण्यात येत आहे.
पनवेल वार्ता न्युज वेब वाहिनीद्वारे सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ह्या क्रिकेट सामन्यात महिला पोलीस, महिला वाहतूक पोलीस , नर्स , समाजसेविका, महिला पत्रकार आदी सर्व क्षेत्रातील महिला सहभागी होणार आहेत.
तसेच प्रथम पारितोषिक रोख रक्कम १५००० व भव्य चषक, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम १००० व भव्य चषक, उत्तेजनार्थ पारितोषिक रोख रक्कम ३००० व सन्मानचिन्ह संघास देण्यात येणार आहे. उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज यांना आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच खेळात सहभाग घेणाऱ्या सर्व महिला खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.