शिवसेना युवासेनेच्या दणक्यानंतर 60 कामगारांना मिळाला न्याय.

शिवसेना युवासेनेच्या दणक्यानंतर 60 कामगारांना मिळाला न्याय
पनवेल, दि.25 (संजय कदम) ः
शिवसेना युवा सेनेच्या दणक्यानंतर 60 कामगारांना अखेरीस न्याय मिळाला आहे.
खारघर मधील बी अ‍ॅण्ड एच इंटरनेटमेंट प्रा.लि., स्वीगी इन्स्टामार्ट (खारघर) या खाजगी कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या 60 कामगारांना अन्याय कारक अपमानास्पद वागणूक देत कामावरून काढून टाकु असे सांगण्यात आले होते, हे कळताच युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचीत राऊत, शिवसेना नवीन पनवेल शहर प्रमुख रूपेश ठोंबरे (बिनधास्त)यांनी खारघर येथे बी अ‍ॅण्ड एच इंटरनेटमेंट प्रा.लि., या कंपनी मध्ये जाऊन कंपनीच्या मॅनेजर सोबत यशस्वी चर्चा करुन कामावरून काढून टाकलेल्या 60 मुलांना लगेच कमावर घेण्यास भाग पाडले व सोबत मुलांना योग्य ती सन्मानाची वागणुक द्यावी अशा सूचना दिल्या अन्यथा शिवसेना युवासेना यापुढे कडक कारवाई करेल,असे ठणकावून सांगितले. यावेळी शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य दत्ता भोपी, संकेत पाटील, युवासैनिक(खारघर), शिवसेना नवीन पनवेल शाखा प्रमुख रवी पाटील, शिवसेना शाखा प्रमुख सुकेश भोपी, उपशाखा प्रमुख अक्षय म्हसकर आदी उपस्थित होते. यावेळी सर्व मुलांनी शिवसेना युवासेनेचे मनापासून आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.