सहायक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी दुसर्‍यांदा मास्टर  मि.भारत श्री 2022 किताबाचा मानकरी.

सहायक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी दुसर्‍यांदा मास्टर  मि.भारत श्री 2022 किताबाचा मानकरी.
पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या मास्टर महाराष्ट्र श्री 2022 या स्पर्धेमध्ये 80 किलोवरील गटामध्ये सुवर्ण पदक पटकावून मास्टर महाराष्ट्र श्री2022  हा किताब दुसर्‍यांदा मिळविलेला होता.त्यांची निवड महाराष्ट्र संघातून पॉण्डेचरी येथे होणार्या मास्टर मि. महाराष्ट्र भारत श्री 2022 यासाठी झालेली होती.
इंडियन बॉडीबिल्डींग फेडरेशन यांच्यावतीने पाँडेचरी (तामिळनाडू  )या ठिकाणी दि.22 ीें 23 फेब्रुवारी रोजी   घेण्यात आलेल्या मास्टर भारत श्री 2022 या शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये महामार्ग  पोलिस केंद्र पळस्पे चे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी 80 किलो वरील गटामध्ये  सुवर्णपदक पटकाविले.तसेच मास्टर भारत श्री चा किताब सलग दुसर्‍यांदा पटकाविला. 15  ते 21 जुलै 2022  रोजी होणार्या मि.एशिया 2022  या  आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी  भारतीय संघातून त्यांची  निवड करण्यात आलेली आहे. यापूर्वी त्यांनी ऑक्टोबर मध्ये ताश्कंद (उझबेकिस्तान )या ठिकाणी झालेल्या वर्ल्ड बॉडीबिल्डिंग स्पर्धेमध्ये ब्राँझपदक मिळविले होते.
ते सध्या  मि.ऑलिम्पिया सुनीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वन अबाव्ह जिम नेरुळ व रिसेट जिम बांद्रा  मुंबई या ठिकाणी  सराव करीत आहेत. या स्पर्धेसाठी त्यांना चेतन पाठारे वर्ल्ड बॉडीबिल्डिंग सेक्रेटरी तसेच विक्रम रोठे वर्ल्ड  बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे लिगल अँडव्हायझर,प्रशांत आपटे  साऊथ एशिया बॉडीबिल्डिंग संघटनेचे सेक्रेटरी .हिरल शहा इंडियन बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या सेक्रेटरी यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर पोलीस खात्यातील अतिवरिष्ठ व वरिष्ठ अधिकारी व सामाजिक व राजकीय क्षेत्रातून  यांचेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल  हेमंत नगराळे. पोलीस आयुक्त मुंबई शहर, पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विनय कारगांवकर अप्पर पोलिस महासंचालक, कुलवंतसिंग अप्पर पोलिस महासंचालक वाहतूक,बिपीनकुमार पोलीस आयुक्त नवी मुंबई, विश्‍वास नांगरे पाटील अप्पर पोलीस आयुक्त मुंबई शहर, अनुपकुमार सिंह अप्पर पोलिस महासंचालक प्रशासन महाराष्ट्र राज्य, डॉ जय जाधव सहपोलिस आयुक्त नवी मुंबई.यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.