डॉ. प्रभाकर पटवर्धन रुग्णालयात निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीर.
डॉ. प्रभाकर पटवर्धन रुग्णालयात निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीर
पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः डॉ. प्रभाकर पटवर्धन यांचा स्मृतिदिन व डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या शुभारंभाचे औचित्य साधून निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्वचारोग तज्ञ डॉ. पुरुषोत्तम घुसे, नेत्ररोग तज्ञ डॉ. रविश वैष्णव, अस्थिरोग तज्ञ डॉ. रेखांश साईकर , डॉ. सारंग पत्की व डॉ. सौरभ कुलकर्णी , दंतरोग तज्ञ डॉ. ऋतुजा पाटील, जनरल सर्जरी तज्ञ डॉ. आदित्य ओक , स्त्रीरोग तज्ञ डॉ. संदीप ननावरे व डॉ. स्मिता सोनी तसेच रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक व जनरल सर्जरी तज्ञ डॉ. भक्ती सारंग यांचे मोलाचे योगदान लाभले.
या शिबिरात एकूण 189 रुग्णांनी लाभ घेतला तसेच या शिबिरात ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांची माफक दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे अशी माहिती रुग्णालयाचे सचिव श्री. राजीव समेळ व चीफ ऑपरेशनला मॅनेजर सुनील लघाटे यांनी सांगितले.