खारघर मध्ये गजानन महाराज प्रकट दिन सोहळा संपन्न.

खारघर मध्ये गजानन महाराज प्रकट दिन सोहळा संपन्न

खारघर पत्रकार संघाचे संस्थापक सचिव संतोष वाव्हळ यांच्या निवास्थानी करण्यात आले होते आयोजन

खारघर / प्रतिनिधी :- खारघर पत्रकार संघाचे संस्थापक सचिव संतोष वाव्हळ यांच्या निवास्थानी बुधवारी ( ता.23) गजानन महाराजांच्या 144 व्या प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गजानन महाराज यांचा 144 वा प्रकट दिन संपूर्ण महाराष्ट्रात सहा देशभरात साजरा करण्यात येत आहे. सालाबाद प्रमाणे वाव्हळ यांच्या खारघर येथील निवासस्थानी देखील सालाबाद प्रमाणे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व सत्यनारायण महापूजा ठेवून महाप्रसाद ठेवण्यात आला होता, यावेळी दर्शनाचा महाप्रसादाचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला.रात्री संत मुक्ताई महिलाचा भजनाचा कार्यक्रम झाला या प्रसंगी संतोष वाव्हळ व सौ राजश्री वाव्हळ मुलगा स्वराज व विराज यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.या पूजेला सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड, खारघर पोलीस स्टेशनचे क्राईम पी आय विमल बिडवे,क्रियाशील प्रेस क्लब चे संस्थापक व दैनिक वादळवारा चे संपादक ज्येष्ठ पत्रकार विजय कडू क्रियाशील प्रेस क्लबचे अध्यक्ष केवल महाडिक कोषाध्यक्ष विशाल सावंत पत्रकार अनिल रॉय, पत्रकार प्रदीप ठाकरे, पत्रकार शंकर वायदंडे, पत्रकार साक्षी सांगवेकर ग्राम विकास अधिकारी भाऊसाहेब भोजने, पनवेल महानगरपालिका अ प्रभाग समिती सभापती संजना समीर कदम, माजी सभापती नगर सेवक अभिमन्यू पाटील, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, नगरसेवक हरीश केणी, भाजपा खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल,रायगड जिल्हा युवा मोर्चा मा.सरचिटणीस समीर कदम,भाजप उत्तर रायगड जिल्हा महिला चिटणीस गीता चौधरी,राष्ट्रीय महिला भारत रक्षा मंच अध्यक्ष बिना गोगरी, सोशल मीडिया उपाध्यक्ष मोना अडवाणी, खारघर भाजप सरचिटणीस दीपक शिंदे, खारघर भाजप महिला मोर्चा उपाध्यक्ष प्रतीक्षा कदम, महिला मोर्चा चिटणीस अंकिता वारंग, खारघर भाजपा शिक्षक सेल अध्यक्ष संदीप रेड्डी,भाजपा युवा मोर्चा खारघर तलोजा मंडळ अध्यक्ष विनोद घरत,खारघर प्रभाग चार अध्यक्ष वासुदेव पाटील, काशिनाथ घरत, माणिक म्हात्रे, शिवसेना विभाग प्रमुख मनिष पाटील,विभाग प्रमुख नंदू वारुंगसे, विभाग प्रमुख नितीन कुमार सूर्यवंशी, शाखाप्रमुख पांडुरंग घुले,सचिन बारवे, युवा शाखा अधिकारी अक्षय कदम, के वाय सी चे अध्यक्ष विकास सोरटे आणि सहकारीतसेच अनेक नागरिकांना उपस्थित राहून दर्शन घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.