अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्याचा महाविकास आघाडीने पनवेलमध्ये केला निषेध.

अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्याचा महाविकास आघाडीने पनवेलमध्ये केला निषेध
पनवेल, दि.24 (वार्ताहर)- अल्पसंख्यांक मंत्री ना. नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. त्याचा निषेध करण्यासाठी आज पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी रायगड शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, शिवसेना तालुका संपर्क प्रमुख योगेशे तांडेल, विधानसभा संघटक दिपक निकम, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, शहरप्रमुख प्रवीण जाधव, शहरप्रमुख रूपेश ठोंबरे, उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील, पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतिश पाटील, कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, अभिजीत पाटील, ताहिर पटेल, पनवेल व नविन पनवेल अध्यक्ष सुनिल मोहोड, सचिव संजय परब, उपाध्यक्ष विश्वजित मारवा, उपाध्यक्ष संकेत वाणी, उपाध्यक्ष दिपक बताले, शेतकरी कामगार पक्षाचे माजी पंचायत समिती सभापती काशिनाथ पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. सी. घरत, डॉ. भक्तीकुमार दवे, डॉ. अमित दवे, तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी, शहराध्यक्ष लतिफ शेख, राष्ट्रवादी काँग्रेस खांदा काॕलनी अध्यक्ष सुनिल नाईक, शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक गणेश कडू, नगरसेवक रविंद्र भगत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेश सरचिटणिस संदीप म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पनवेलच्या महिला निरीक्षक सौ. शशिकला सिंह, अमिता चौहान, कैलास पाटील, उपशहरप्रमुख राहूल गोगटे, सुजन मुसलोंडकर, विभागप्रमुख अतुल पलण, पराग मोहिते, सनी टेमघरे, कुणाल कुरघोडे, रामदास पाटील, समाजवादी पक्षाचे नाईक व इतर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केंद्र सरकारचा निषेध केला.

Leave a Reply

Your email address will not be published.