मालमत्ता करावर शास्तीचा बोजा नको 

मालमत्ता करावर शास्तीचा बोजा नको
विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनी पालिका आयुक्तांची भेट.

पनवेल:एकीकडे मालमत्ता कर आकारनीला पालिका क्षेत्रातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.त्यातच 1 एप्रील पासुन वेळेत कर न भरलेल्या नागरिकांना दंड स्वरूपात शास्ती लावण्याचा ईशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे.याबाबत शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांनी विरोधीपक्षाच्या नगरसेवकांसह पालिका आयुक्त गणेश देशमुख यांची दि.23 रोजी भेट घेत शास्ती लावण्याचा निर्णय पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
पालिका प्रशासन मालमत्ता कर लावण्याबाबत ठाम आहे.विशेष म्हणजे वेळेत कर न भरल्यास नागरिकांवर थकीत करासह दंड देखील भरावे लागणार असल्याने पनवेल मधील राजकारण पुन्हा तापणार आहे.मागील दोन वर्षांपासून सुरु असलेला मालमत्ता कराचा तिढा सुटताना दिसत नाही.राजकारणी नागरिकांना मालमत्ता कर भरू नका ,शासन स्तरावर योग्य निर्णय होईल असे आश्वासन देत असताना शासकीय स्तरावर कोणताच निर्णय होताना दिसत नाही.यामुळे नागरिकांच्या डोक्यावर मालमत्ता करासह शास्तीचा बोजा पडण्याची शक्यता आहे.हा अतिरिक्त बोजा पडू नये म्हणुन आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वात विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे,राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश पाटील,अरविंद म्हात्रे ,गोपाळ भगत ,गणेश कडू ,प्रीती जॉर्ज म्हात्रे,डॉ सुरेखा मोहोकर ,सारिका भगत ,प्रिया पाटील आदींनी आयुक्तांची भेट घेत शास्तीचा निर्णय पुढे ढकलण्याची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.