शिवजयंतीच्या निमित्ताने रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा”जे.एम.म्हात्रे चॅरीटेबल संस्थेचा स्तुत्य उपक्रम”

शिवजयंतीच्या निमित्ताने रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा”जे.एम.म्हात्रे चॅरीटेबल संस्थेचा स्तुत्य उपक्रम”
पनवेल :  दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या पुढाकाराने खांदा कॉलनी, पनवेल आणि नवीन पनवेल मधील रुग्णांसाठी विरोधी पक्षनेते श्री प्रीतम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून “ना नफा,ना तोटा” या तत्वावर रुग्णवाहिका लोकार्पण सेवेचा शुभारंभ करण्यात आला.      याविषयी अधिक माहिती देताना श्री प्रीतम म्हात्रे म्हणाले की कोरोना काळात मी माझ्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून पनवेल करांसाठी आरोग्य सेवेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी औषध उपलब्ध करून देणे आवश्यक त्या रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा देणे योग्य उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जागा करून देणे या अशा अनेक गोष्टी वेळप्रसंगी गरीब व गरजू रुग्णांना हॉस्पिटलची संपूर्ण जबाबदारी उचलणे अशा प्रकारच्या अनेक सेवा केल्या. त्यादरम्यान माझ्या असे लक्षात आले की काही ठिकाणी रुग्णवाहिका चालक जास्त दरात रुग्णवाहिका देऊन या रुग्णवाहिका सेवेचा दुरुपयोग करून नागरिकांना ठिकाणी वेठीस धरण्याचे प्रकार घडत आहेत. यावर उपाय म्हणून मी या अगोदरही दोन रुग्णवाहिका ना नफा ना तोटा या तत्वावर पनवेल-उरण ला सेवा सुरू केली आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून मी खांदा कॉलनी मध्ये या रुग्णवाहिका सेवेचा लोकार्पण केले. यापुढेही पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आवश्यक त्या ठिकाणी अशा प्रकारची सेवा देण्याचा माझा मानस आहे.       या कार्यक्रमाच्या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस श्री.गणेश कडू, नगरसेविका डॉ.सौ.सुरेखा मोहकर, सौ.प्रीती जॉर्ज म्हात्रे,सौ.सारीका भगत,सौ.कुसुम गणेश पाटील,मा.उपनगराध्यक्ष श्री गणेश पाटील,शेकाप खांदा कॉलनी अध्यक्ष श्री..अनिल बंडगर ,कार्याध्यक्ष श्री.योगेश कोटेकर, शेकाप महिला आघाडी अध्यक्ष सौ.दर्शना भडांगे ,शेकाप महिला आघाडीच्या माधुरी गोसावी, शेकाप महिला आघाडी पदाधिकारी ,ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.       “ना नफा,ना तोटा” या तत्त्वावर सुरू केलेल्या रुग्णवाहिका सेवेबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आजची तरुण युवा पिढी विरोधी पक्षनेते श्री.प्रितम म्हात्रे लोकआग्रहा खातिर  सामाजिक बांधिलकीतून असे लोकोपयोगी उपक्रम हाती घेत आहे याचे आम्हाला नक्कीच कौतुक आहे. जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून पनवेल परिसरात नेहमीच ज्येष्ठ नागरिक आणि महिला तसेच युवकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातात बऱ्याच लोकांना त्याचा लाभ होतो यापुढेही असे उपक्रम सुरू राहण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.