स्व:श्री साई नारायणबाबा यांच्या 86 व्या जयंतीनिमित्त सामूहिक विवाहासह निराधार माताभगिनींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.


पनवेल दि.19 (संजय कदम)- पनवेल येथील सुप्रसिद्ध अशा साईबाबा मंदिराचे स्व. श्री साई नारायणबाबा यांच्या 86 व्या जयंतीनिमित्त आज सामूहिक विवाहासह निराधार माता भगिनींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून श्री नारायणबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सद्गुरू श्री साई नारायण बाबा यांच्या आशीर्वादाने सामूहिक विवाह सह निराधार माता भगिनींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. आजही त्यांच्या 86 व्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय आय़ोजित कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या शुभहस्ते निराधार माता भगिनींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच सामूहिक विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या वधू वरांना त्यांनी आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. यावेळी ट्रस्टचे चेअरमन खेमचंद गोपलानी, को-ऑर्डिनेटर राम थदानी, सचिव रामलाल चौधरी, ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, संजय कदम यांच्यासह इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होते. यावेळी बोलताना महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी सांगितले की, या मंदिर व ट्रस्टच्या माध्यमातून सामूहिक शास्त्रयुक्त कन्यादान हा उपक्रम राबविला जात आहे. यात वधु वरांना सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची अंगठी व संसाराला लागणाऱ्या सर्व वस्तू या देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे निराधार विधवा, माता भगिनींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप दरमहिन्याला करण्यात येते तसेच आजही करण्यात आले आहे. नारायणबाबा आज आपल्यात नसले तरी त्यांचे आशीर्वाद व त्यांनी सांगितलेले उपदेशपर मार्गदर्शन बरोबर आहे. त्यांनी आखून दिलेल्या समाजसेवेच्या मार्गावर सर्वांनी चालून गोरगरिबांना मदत करावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
फोटोः स्व. श्री साई नारायणबाबा यांच्या 86 व्या जयंतीनिमित्त सामूहिक विवाहासह निराधार माताभगिनींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना मान्यवर

Leave a Reply

Your email address will not be published.