शिवजयंतीनिमित्त महेश साळुंखे यांची विविध ठिकाणी उपस्थिती.

शिवजयंतीनिमित्त महेश साळुंखे यांची विविध ठिकाणी उपस्थिती
पनवेल दि.19 (वार्ताहर)- स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी आज पनवेल परिसरातील अनेक शिवजयंतीला भेट देऊन तेथे उपस्थिती लावली आहे.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी अभिवादन केले. पनवेल महानगरपालिका आयोजित कार्यक्रमात ते सहभागी झाले आहेत. तसेच स्व. लोकनेते दि.बा. पाटील प्रकल्पग्रस्त रिक्षा चालकमालक संघटना आयोजित शिवजयंती उत्सवास त्याचप्रमाणे करंजाडे गणेश नगर येथील शिवजयंती उत्सवात सहभागी होऊन अभिवादन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.