प्रवीण दरेकरांच्या गाडीला तिसऱ्यांदा अपघात; दरेकर बचावले.

Breaking News प्रवीण दरेकरांच्या गाडीला तिसऱ्यांदा अपघात; दरेकर बचावले
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीच्या ताफ्याचा सातारा येथील पुणे बंगलोर महामार्गावर खंडाळ्याजवळ अपघात झाल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर आज सकाळी पुन्हा जोगेश्वरी, विक्रोळी लिंक रोडवरती एनएसजी कॅम्पजवळ दरेकर यांच्या गाडीला अपघात झाला. या महिनाभरात दरेकरांच्या गाडीला तिस-यांदा अपघात झाला असून तिन्ही अपघात एकसारखे आहेत.
भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या आतापर्यंतच्या तिन्ही अपघाताचे कारण म्हणजे मोटारसायकल स्वार अचानक पुढे आल्याने अपघात झाला आहे. कुठेतरी घातपाताचा प्रकार केला जात असल्याचा संशय प्रवीण दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे दरेकरांनी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
भाजप नेते प्रवीण दरेकर हे गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यभर दौरे करत आहेत. त्यांच्या गाडीच्या ताफ्याची अपघाताची मालिका सुरू असून आजचा हा प्रकार तिस-यांदा झाला आहे. त्यामुळे मी चौकशी करणार असल्याचे देखील दरेकरांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.