महावितरण कडून शिवजयंतीची जय्यत तयारी.
महावितरण कडून शिवजयंतीची जय्यत तयारी
अखंड वीज सुरळीत राहण्यासाठी साफसफाई
पनवेल दि.१८ (वार्ताहर)- व्ही के हायस्कूल जवळ असलेल्या आणि शहरातील इतर ठिकाणी रोहित्र जवळ वेली वाढल्या होत्या.सहाय्यक अभियंता, टपालनाका शाखा डी.के.मोरे यांनी सोबत कर्मचारी घेऊन परिसर स्वच्छ करून घेतला.आज शिवाजी महाराजांच्या जयंतीमुळे परिसरात कुठे वीज खंडित होण्याचे प्रकार होऊन पवित्र दिनी शिवभक्तांचा हिरमोड होऊ नये या करिता युध्यपातळीवर काम करून घेतले असल्याचे मोरे यांनी सांगितले.