साईबाबा मंदिराजवळ16 वर्षीय मुलगा बेपत्ता.

काशीबाई झोपडपट्टी येथून मुलगा बेपत्ता.

पनवेल / प्रतिनिधी : पनवेल शहरातील काशीबाई झोपडपट्टी साईबाबा मंदिराजवळ परिसरात राहणारा एक 16 वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याने त्याचा शोध पनवेल शहर पोलिस करीत आहेत.

      साई योगेश कुमार रेड्डी वय 16 वर्षे असे या मुलाचे नाव असून तो अंगाने सडपातळ, रंग सावळा, उंची पाच ते साडे पाच फूट, चेहरा उभट लांब, नाक बसके, केस काळे, काळ्या रंगाचे हाफ बाह्याचे टी शर्ट, हिरव्या रंगाचे नाईट पॅन्ट, उजव्या कानात बाली घातलेली आहे. तसेच त्याला मराठी, हिंदी, तामीळ भाषेचे ज्ञान असून बोबडे बोलतो. सदर मुलगा हा काशीबाई झोपडपट्टी पनवेल येथून निघून गेला असून या मुलाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे दुरध्वनी-02227452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक दिपक शेळके यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published.