वाइनची बाटली पडली 65 हजार रुपयांना.
वाइनची बाटली पडली 65 हजार रुपयांना पनवेल, दि.16 (वार्ताहर)- ऑनलाईन ऑर्डर केलेली एक वाईनची बाटली महिलेला तब्बल 65 हजार 119 रुपयांना पडली आहे. आरोपींविरुद्ध खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर सेक्टर 5 येथील राहणाऱ्या महिलेने गुगल वरून पायना वाईन्स नावाच्या शॉप मधून 1 हजार 400 रुपयांची एक वाईन ऑर्डर केली होती. यावेळी त्यांना समोरील व्यक्तीने व्हाट्सअप वर क्यू आर कोड पाठवला. त्याद्वारे त्यांनी चौदाशे रुपये त्याला पाठवले. यावेळी अर्ध्या तासात ऑर्डर घरी डिलिव्हरी होईल असे सांगण्यात आले. त्यानंतर समोरील क्रमांकावरून त्यांना व्हाट्सअप कॉल आला आणि गुगल प्ले वर रजिस्टर करायचे असल्याचे सांगितले. त्यांनी गुगल प्ले चालू केले व ऑप्शन वर क्लिक करण्यासाठी सांगितले. त्यानंतर युपीआय पिन टाकण्यास सांगितले. यावेळी अठरा हजार 373 रुपये त्यांच्या खात्यातून वजा झाले त्यानंतर बोलण्यात गुंतवून पैसे आले नसल्याचे सांगून एकूण 65 हजार 119 रुपये महिलेच्या खात्यातून वजा झाले.