व्हि. के.हायस्कूल मार्गालगत असलेल्या ट्रान्सफॉर्मर परिसाराची डागडुजी लवकर करा.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल शहरातर्फे पनवेल शहर उपशहराध्यक्ष संदिप पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अधिकारी श्री. बोके साहेबांना व्हि. के. हायस्कूल मार्गालगत असलेल्या ट्रान्सफॉर्मर परिसाराची डागडुजी करण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित मनसेचे सिध्दू खानविलकर, सचिन सिलकर,ईस्माइल तांबोळी, अक्षय जोशी,आकाश दलाल, अलंकार घाटे,सदर बोके साहेब याच्यांकडून परिसराची डागडुजी त्वरीत करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.