विविध विकास कामांचा आयुक्तांनी घेतला आढावा.

विविध विकास कामांचा आयुक्तांनी घेतला आढावा

पनवेल,दि.16 : सिडकोकडून मिळालेल्या भूखंडाचा विकास करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या विविध विभागांनी वेगाने कामास लागावे अशा सूचना आयुक्त श्री गणेश देशमुख यांनी आज (16 जानेवारी) झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकित संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, नगररचना सहाय्यक संचालक ज्योती कवाडे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, लेखाधिकारी डॉ. संग्राम व्होरकाटे तसेच सर्व विभागप्रमुख,खाते प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर प्राथमिक सुविधांवरती काम केल्यावरती यापुढे सिडकोकडून मिळालेल्या भूखंडाचा विकास करण्याच्या दृष्टीने बांधकाम विभाग तसेच संबधित विभागांनी तातडीने कामे पूर्ण करावीत अशा सूचना आयुक्तांनी आजच्या बैठकित दिल्या. यामध्ये प्रशासकिय इमारत, महापौर बंगला, प्रभाग समिती कार्यालये यांच्या निविदा प्रक्रियांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे यादृष्टीने आयुक्तांनी सूचना दिल्या. याचबरोबर क्रिकेट प्रशिक्षण केंद्र, वसतिगृहे, दफनभूमी या कामांचा आढावा आयुक्तांनी घेतला.
सध्या पॉस मशीनद्वारे विविध प्रकारचा दंड भरला जात असला तरी येत्या एप्रिल महिन्यापासून कोणतेही पावती पुस्तक न छापता सर्व पावत्या पॉस मशिनद्वारे करण्याच्या दृष्टीने लेखा विभागाला आयुक्तांनी सूचना दिल्या. या माध्यमातून पावती मुक्त महापालिका करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
येत्या आठ मार्चला ‘जागतिक महिला दिन’ आहे. त्यादृष्टीने संबधित विभागास विविध सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच शिवजयंती विषयक कामाचा आढावा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.