रामदास गोंधळी , शिवाजी दांगट, गणेश परब यांची करण्यात आली नियुक्ती..

आज दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ रोजी शिवसेना पक्षप्रमुख कथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना नेते व संपर्क नेते कोंकण विभाग तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सन्माननीय सुभाष जी देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड माननीय श्री. शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खांदाकॉलनी येथील रामदास गोंधळी यांची उपमहानगर प्रमुख पदी, शिवाजी दांगट यांची उप महानगर संघटक पदी व गणेश परब यांची खांदाकॉलनी शहर समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी शिवसेना पनवेल महानगर प्रमुख श्री रामदास शेवाळे, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, उपमहानगर प्रमुख दिपक घरत व खांदा कॉलनी शहर प्रमुख सदानंद शिर्के आदी पदाधिकारी उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published.