बी.सी.ठाकूर सनच्या वेअरहाऊस अँण्ड लॉजीस्टीक कार्यालय करंजाडे येथे सुरु.

बी.सी.ठाकूर सनच्या वेअरहाऊस अँण्ड लॉजीस्टीक कार्यालय उद्योजक भरतशेठ चांगू ठाकूर यांनी करंजाडे येथे सुरु केले आहे. या कार्यालयाचे उदघाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आज (मंगळवारी) झाले. या वेळी बी.सी.ठाकूर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदी प्रतिक ठाकूर यांची निवड झाली. त्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, श्रीधरशेठ ठाकूर, कृष्णाशेठ ठाकूर, डी.बी.ठाकूर, कान्हाशेठ ठाकूर, भरतशेठ ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, एमकेसीएलचे कोकण अध्यक्ष जयंत भगत, रजनी ठाकूर, पायलट प्राप्ती ठाकूर, प्रतीक ठाकूर, भारत श्रीधर ठाकूर, सागरशेठ ठाकूर, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा तथा पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, वर्षा प्रशांत ठाकूर, स्वप्नील ठाकूर, मयूर ठाकूर, प्रिया ठाकूर, राज ठाकूर, अमोघ ठाकूर यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.