समाजसेवक दिलीप रामदास शेलार यांच्यासह शेकडो जणांनी केलेला शिवसेनेत जाहीर प्रवेश

समाजसेवक दिलीप रामदास शेलार यांच्यासह शेकडो शेकडो जणांनी केलेला शिवसेनेत जाहीर प्रवेशपनवेल, दि.15 (संजय कदम)- शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली व शहर प्रमुख पनवेल प्रवीण जाधव यांच्या विशेष प्रयत्नाने पनवेल शहर व पनवेल कोळीवाडा येथील समाजसेवक दिलीप रामदास शेलार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.
      यावेळी रायगड जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर, तालुका संघटक भरत पाटील,विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगरप्रमुख रामदास शेवाळे,महानगर संघटक प्रथमेश सोमण, उपमहानगर प्रमुख दिपक घरत,मा.शहरप्रमुख अच्युत मनोरे,उपशहर प्रमुख अनिल कुरघोडे, युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहिते, पुरुष पदाधिकारी आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.