रायगड जिल्हा युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेत खांदा कॉलनी शाखेला तृतीय विजेतेपद.
रायगड जिल्हा युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेत खांदा कॉलनी शाखेला तृतीय विजेतेपद
दि. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी रायगड युनिफाईट असोसिएशन च्या वतीने सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल स्कुल आकुर्ली येथे ९ व्या रायगड जिल्हा युनिफाईट निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या खांदा कॉलनी शाखेने १० सुवर्णपदक ९ रौप्यपदक आणि २ कांस्यपदक मिळवत तृतीय क्रमांक संपादित केला. विजेत्या खेळाडूंची २७ आणि २८ फेब्रुवारी २०२२ रोजी कराड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय युनिफाईट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची नावे
१. आदित्य कापडोस्कर
२. अथर्व मसुरकर
३. कादंबरी बोराडे
४. श्रेया शिंदे
५. साक्षी केवट
६. ओम पिसाळ
७. पंक्ती पाठक
८. अलोकी पालवे
९. अनिरुद्ध खरात
१०. विघ्नेश पाठक
रौप्यपदक विजेत्या खेळाडूंची नावे
१. विवान कटियार
२. भार्गव भगत
३. रिया चव्हाण
४. हर्षद मेहेत्रे
५. अक्षयिनी मांजरेकर
६. श्रुती शिंदे
७. पिनांक्ती देशमुख
८. पल्लवी कणसे
९. शिवम केवट
कांस्यपदक विजेत्या खेळाडूंची नावे
१. शर्वरी बनसोडे
२. स्मित पाटील
हे सर्व खेळाडु आगरी शिक्षण संस्था, एड्युकिडझ इंटरनॅशनल खांदा कॉलनी येथे सेन्सेई प्रतिक कारंडे यांच्याकडे कराटे आणि इतर मार्शल आर्टस् चे प्रशिक्षण घेत आहेत. विजेत्या खेळाडुंचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे तसेच युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र युनिफाईट संघटनेचे सचिव डॉ. मंदार पनवेलकर सर यांनी खेळाडुंचे विशेष कौतुक करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.