नाट्य प्रेमींसाठी पनवेलमध्ये रंगणार रंगछटा 2022.

नाट्य प्रेमींसाठी पनवेलमध्ये रंगणार रंगछटा 2022″जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि रिफ्लेक्शन थिएटर यांचा पुढाकारपनवेल : कोरोना काळात पनवेल आणि उरण परिसरातील कला प्रेमींना त्यांच्या कला सादर करण्याला ब्रेक लागला होता. परंतु शासनाने आता बरेचशे निर्बंध उठवल्यामुळे नाट्यगृह पुन्हा सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत आपल्या पनवेल आणि उरण परिसरातील कला प्रेमींसाठी एक व्यासपीठ मिळावे यासाठी प्रितम म्हात्रे यांच्या “जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या” माध्यमातून  पनवेल मधीलच तरुण युवक कलाप्रेमींच्या “रिफ्लेक्शन थियेटर” च्या नियोजनाखाली एकपात्री आणि द्विपात्री नाटक स्पर्धेचे आयोजन 16 फेब्रुवारी 2022 रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे सकाळी 10.00 वाजता रंगछटा 2022 या नाट्य स्पर्धेचे आयोजन येथे केले आहे.         या स्पर्धेमध्ये एकपात्री आणि द्विपात्री अशा दोन्ही स्वरूपात स्पर्धा रंगणार आहे यामध्ये एकपात्री साठी प्रथम पारितोषिक 3001/- द्वितीय पारितोषिक 2001/- तृतीय पारितोषिक 1001/-  तसेच द्विपात्री साठी प्रथम पारितोषिक 5001/- द्वितीय पारितोषिक 3001/- आणि तृतीय पारितोषिक 2001/- उत्तेजनार्थ पारितोषिके तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे, अधिक माहितीसाठी आपण 9527099784 /  7021469567 या क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती आयोजकांकडून सांगण्यात आली.       पनवेल-उरण मधील कलाप्रेमींसाठी ही एक सुरुवात आहे या पुढेही असे उपक्रम सुरू ठेवण्याचा माझा मानस आहे, जेणेकरून पनवेल उरण मधील तरुणांना एक व्यासपीठ त्यांच्याच विभागात उपलब्ध होईल अशी आशा विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published.