९ फेब्रुवारी २०२२ ते १५ तारखेपर्यंत पीर करमअली शहा दर्ग्याच्या उर्सानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे शिवसेनेचे सल्लागार श्री.बबनदादा पाटील साहेब यांच्याहस्ते उदघाटन.

९ फेब्रुवारी २०२२ ते १५ तारखेपर्यंत पीर करमअली शहा दर्ग्याच्या उर्सानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे शिवसेनेचे सल्लागार श्री.बबनदादा पाटील साहेब यांच्याहस्ते उदघाटन.
आम्ही सर्वांचे लाडके प्रिया खासदार मा.श्री.श्रीरंग अप्पा बारणे साहेब यांच्यासह शिवसेना नेत्यांची उपस्थिती. मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

पनवेल / प्रतिनिधी : पीर करमअली शहा दर्ग्याच्या उर्सानिमित्त पनवेल शहर शिवसेना वतीने आयोजित ..शिवसेना पनवेल उपशहर संघटक #अबरारमास्टरकच्छी , कट्टर शिवसैनिक जमील भाई खान, विभाग क्रमांक १४ उपविभाग संघटक जुनेद पवार, विभाग क्रमांक १४ उपविभाग प्रमुख सुफियान मुकादम , विभाग क्रमांक १४ साईनगर शाखाप्रमुख नुरुल्लह वाईकर, यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. शुश्रुशा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आयोजित आरोग्य तपासणी शिबिरामध्ये रक्त तपासणी, शुगर टेस्ट, सीबीसी, ईसीजी, पल्, एक्स रे, वजन तपासणी यासारख्या तपासण्या करण्यात आल्या. या आरोग्य शिबिरात ५००हुन अधिक लोकांनी लाभ घेतला. या आरोग्य शिबिराचे उदघाटन शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील साहेब व महानगर संघटक श्री.प्रथमेश सोमण यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच या आरोग्य शिबिरास खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट दिली तसेच पनवेल शहरातील पिर करमअली शहा दर्ग्याच्या उर्सामध्ये जाऊन आशीर्वाद घेतले. या रक्तदान शिबिरास डॉ. राजेंद्र क्षीरसागर, डॉ. रेश्मा शेख, नर्स साक्षी पाटील, लॅब टेक्निशियन ईश्वरी कल्याणकर आदींनी विशेष मेहनत घेतली. सदर शिबिरास शिवसेना पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, माजी नगरसवेक लतीफभाई शेख, माजी उपशहर संघटक बाबुभाई, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.